रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार व ई पीक पाहणी प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून केलेल्या कामाबाबत मी समाधानी – रामदास जगताप

 

ई फेरफार व ई पीक पाहणी प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून केलेल्या कामाबाबत मी समाधानी –

रामदास जगताप

 

नमस्कार मित्रांनो

                    डिजिटल सातबाराचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वताहून ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून  जबाबदारी स्वीकारून सलग ५ वर्षे ई फेरफार प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज या प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून असलेल्या जबाबदारीतून मुक्त होत असताना मी पूर्ण समाधानी आहे. शासकीय सेवेत दाखल झाल्यापासून ऑनलाईन ७/१२ चे स्वप्न हे स्वप्नच राहते काय असे नेहमी वाटायचे परंतु केंद्र शासनाच्या मदतीने सुरु झालेला राष्ट्रीय भूमी अभेलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP) प्रकल्प आला आणि आशा पल्लवित झाल्या परंतु अनंत अडचणीचा सामना करता असताना आणि हा प्रकल्प अत्यंत अडचणीत असताना सन २०१६-१७ पासून डिजिटल ७/१२ चे स्वप्न उराशी बाळगून या प्रकल्पाचा समन्वयक (स्वयंघोषित पदनाम )  म्हणून काम करण्याचे ठरवले. तत्कालीन जमाबंदी आयुक्त मा. संभाजी कडू पाटील  साहेब यांनी शासनाला प्रस्ताव पाठून माझी सेवा ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून उपलब्ध करून देण्याची विनाणती केली आणि तेंव्हा पासून या प्रकल्पासाठी झोकून द्यायचे ठरवले.  

                पाच सहा वर्षाचे मागे वळून पाहताना आपण या प्रकल्पात करू शकलेलो प्रगती पाहून आज या जबाबदारीतून मुक्त होत असताना आपण बहुतांशी यशस्वी झाल्याचे समाधान निश्चित वाटते. यासाठी राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांचे मला या प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून मला या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानायचे आहेत. महाराष्ट्र राज्य तलाठी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष कै. अशोक कोकाटे व श्री श्याम जोशी आणि राज्य तलाठी संघाचे श्री डुबलआप्पा यांचेसह सर्वच पदाधिकारी व क्षेत्रीय स्थरावर अहोरात्र कष्ट करणारे तलाठी बांधव व मंडळ अधिकारी त्यांचे कोतवाल व अगदी त्यांचे सहाय्यक यांचे देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

                   आपला ई फेरफार प्रकल्प अन्य राज्याच्या तुलनेत अत्यंत उजवा आहे अशा अर्थाने कि यात आपण ७/१२ च्या अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते व दिले आहे. त्यासाठी चावडी वाचनाची मोहीम, एडीट , री एडीट, कलम १५५ च्या दुरुस्त्या यासह विसंगती अहवाल दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज आपण ९९% पेक्षा जास्त अचूकता प्राप्त करू शकलो आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जावून तलाठी मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे प्रशिक्षण असेल अथवा यशदा , पुणे येथे मास्टर ट्रेनर्स साठी विशेष प्रशिक्षण असेल ह्याचा निश्चितच फायदा झाला.

                 ई फेरफार आज्ञावली सोबतच ई पीक पाहणी प्रकल्प देखील राज्य महसूल विभागाने यशस्वी करून दाखवत शेतकरी बांधवांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा खराखुरा फायदा करून देण्याचा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांचे नेतृत्वात महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर साहेब यांनी घेतला त्याचे अंमल बजावणी साठी जमाबंदी आयुक्त मा. निरंजन सुधांशू सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले म्हणूनच आज अखेर सुमारे ९७ लक्ष शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी हे मोबाईल आप डाऊनलोड करून वापरले आहे सुमारे ६७ लक्ष  खातेदार शेतकरी यांनी  ९४ लक्ष  हेक्टर क्षेत्रावर ई पीक पाहणी गेल्या ५ महिन्यात केली.

               राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील २ कोटी ५५ लक्ष सातबाराचे केवळ संगणकीकरण न करता  हे सर्व ७/१२ आणि फेरफार ऑनलाईन तर केलेच शिवाय आता हे सर्व डिजिटल स्वाक्षरीने जगभरातून केंव्हाही आणि कोणालाही २४ तास उपलब्ध करून दिले आहेत.  त्याआर्थाने डिजिटल सातबाराचे स्वप्न साकार झाले.  सातबारा अधिक सुटसुटीत आणि माहितीपूर्ण होण्यासाठी पन्नास वर्षानंतर त्यात महत्वाचे बदल करण्यास शासनाने मान्यता दिली त्यामुळे नवीन स्वरूपातील डिजिटल ७/१२ घरपोहोच करण्याची अत्यंत महात्वाकांशी योजना मा. महसूल मंत्री महोदयांचे कल्पनेतून पूर्णत्वास आली  आणि आता नमुना १२ मध्ये देखील काही महत्वाचे बदल सुचविले आहेत. गेल्या पाच सहा वर्षात राज्यभरात १ कोटी ४० लक्ष पेक्षा जास्त फेरफार ऑनलाईन नोंदविण्यात व निर्गत करण्यात आले आणि आता ते सर्व डिजिटल स्वरूपात सामान्य नागरिकांना महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे ७५ ते ८० हजार नागरिक त्याचा दररोज लाभ घेत आहेत ही खरी समाधानाची बाब आहे.

              महसूल विभागाने महाभूमी पोर्टल, अभिलेख वितरण प्रणाली, व्हर्चुअल अकौंट सुविधा, फेरफार मंजुरीसाठी बायोमेट्रिक सुविधा, विसंगती अहवाल, कलम १५५ ऑनलाईन दुरुस्ती सुविधा, ऑनलाईन वारस नोंदवही, ई पीक पाहणी असे अनेक नवनवीन उपक्रम राबवून नागरिकांचा अत्यंत गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व गतिमान सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व  अत्यंत किचकट व गुंता गुंतीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी  मला सर्वाधिक सहकार्य लाभेले ते म्हणजे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) पुणे येथील वरिष्ठ शाश्रज्ञ व सर्व कंत्राटी विकासक यांचे . या मध्ये श्री अनिल जोंधळे सर , श्री विश्राम चौसाळकर, श्रीमती शुभांगी राव, श्री श्रीकांत कुरुलकर, श्री लक्ष्मीकांत काटे, श्री.राजेंद्र उकिर्डे, श्री संजय कुलकर्णी, श्री उल-हक, श्री संजय कोतकर, आणि दिग्विजय, अर्चना, अभिजित, सीमा, पूजा, सोनाली, दोन  प्रशांत, सुनील, आशिष इ.   

माझ्या या कामासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी व्यक्तिश तत्कालीन जमाबंदी आयुक्त श्री चंद्रकांत दळवी, संभाजी कडू पाटील ,  एस चोक्कलिंगम व सध्याचे जमाबंदी आयुक्त श्री निरंजन सुधांशू , तत्कालीन अप्पर मुख्य सचिव महसूल श्री मनू कुमार श्रीवास्ताव आणि सध्याचे अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर , सह तत्कालीन सह सचिव महसूल कै. संतोष भोगले, सध्याचे सह सचिव महसूल श्री रमेश चव्हाण व डॉ. माधव वीर ,  उप सचिव श्री संजय बनकर , अव्वर सचिव  सुनील कोठेकर व विलास थोरात , भगवान सावंत व कक्ष अधिकारी मंजुषा सोनजे यांचे अमूल्य सहकार्य लाभले . माझ्या सोबत अहोरात्र काम्कार्णारे सर्व विभागीय समन्वयक यांनी देखील यासाठी खूप कष्ट घेतले आहेत त्यांचे देखील विशेष धन्यवाद  क्लाऊड पार्टनर मे. Esds क्लाऊड , आकाशवाणी दूरदर्शन व सर्व वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रोनिक मेडिया प्रतिनिधी मित्र यांचे मनपूर्वक धन्यवाद

“ अनंत अडचणीचा सामना करत ई फेरफार प्रकल्पी पीक पाहणी प्रकाल्प व डिजिटल सातबारा यशस्वी करण्यासाठी माझ्या सर्व सहकारी अधिकारी , राज्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे सर्वांचे कठोर परिश्रम महत्वाचे होते. या प्रकल्पाने ९९% पेक्षा जास्त अचूकता साध्य केली त्यामुळे त्याची फळे आता राज्यातील नागरिकांना मिळू लागली आहेत हे अत्यंत महत्वाचे काम माझे माध्यमातून झाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.”- रामदास जगताप

आपला

 

रामदास जगताप

राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प ‘दि २४.१.२०२२

Comments

Archive

Contact Form

Send