रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून ५ वर्षे सेवा पूर्ण

 नमस्कार मित्रांनो , 


ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून ५ वर्षे सेवा पूर्ण 

    

             तत्कालीन जमाबंदी  आयुक्त  श्री संभाजी कडू पाटील साहेब यांचे विनंती प्रमाणे मी  बरोबर ५ वर्षापूर्वी म्हणजेच दि. १० जानेवारी २०१७ रोजी उप जिल्हाधिकारी महसूल कोल्हापूर येथे पदस्थापना असताना ३ दिवसासाठी ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून आठवड्यातील ३ दिवसासाठी जबाबदारी स्वीकारली त्या नंतर सहा महिने तीन दिवस राज्यभर दौरा आणि तीन दिवस कोल्हापूर येथील काम अशी सेवा करून त्यानंतर पूर्णवेळ राज्य समन्वयक म्हणून एडीट , री- एडीट , चावडी वाचना, odc , कलम  १५५ चे कामकाज, आपली चावडी, महाभू नकाशा, महाभूमी पोर्टल, अभिलेख वितरण प्रणाली, ई पीक पाहणी असे करत करत संगणकीकृत ७/१२ ते ऑनलाईन ७/१२ आणि आता डिजिटल ७/१२ असा थक्क करणारा प्रवास आठवला तर आपण खूप पुढे आल्याचे समाधान वाटते आणि सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांना अशक्य वाटणारे ७/१२ संगणकीकरण पूर्ण  करून राज्याचे  ७/१२ संगणकीकरण आज देशात आघाडीवर ठेवण्यासाठी आपल्या आयुष्यातील ५/६ वर्षे रात्रंदिवस ई फेरफार प्रकल्पासाठी वाहून घेतलेल्या माझ्या  तमाम तलाठी  व मंडळ  अधिकारी बांधवांच्या कष्टामुळे सामान्य माणसाच्या जीवनात थोडा आनंद निर्माण करण्यात यश आले हे खूप महत्वाचे आहे. 

                 महसूल विभागाच्या या डिजिटल क्रांती मध्ये महसूल विभागातील सर्व घटक, राज्य शासन स्थरावरील सर्व घटक, जमाबंदी आयुक्त कार्यालयातील help desk सह सर्व घटक, NIC , cloud पार्टनर सह सर्वसामान्य जनतेचे मोलाचे सहकार्य मिळाले म्हणूनच ई फेरफार प्रकल्प इथपर्यंत पोहचला हे मला आवर्जून अल्लेखावा असे वाटते. 

महसूल विभागाच्या  डिजिटल क्रांतीसाठी  खुप काही केले आहे परंतु अजून खूप काही बाकी आहे  ...........

सेवेतून समाधान - महसूल विभाग 



आपला ,


रामदास जगताप 

राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प व ई पीक पाहणी प्रकल्प 

जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे 

दि १०.१.२०२२ 

Comments

  1. तलाठ्याने जिल्हा न्यायालयाच्या 18/10/2021 च्या आदेशानुसार प्रोबेट वैध ठरवून फेर घेतला होता.ते प्रोबेट मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचच्या 6/12/2021 आदेशानुसार प्रोबेट रद्द करण्यात आले. आता पुर्वीच्या तो फेरफार रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्यात कोणाला आहे याबाबत माहिती द्यावी? शेत जमीन औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील आहे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send